धक्कादायक! विमा पॉलिसीच्या पैशांसाठी पत्नीने केली पतीची हत्या

पंजाबच्या (Punjab) अमृतसरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
धक्कादायक! विमा पॉलिसीच्या पैशांसाठी पत्नीने केली पतीची हत्या
punjab crime news woman killed husband for money of lic policy Saam Tv

अमृतसर : पंजाबच्या (Punjab) अमृतसरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विमा पॉलिसीच्या पैशांच्या मोहापायी पत्नीने पतीची हत्या (Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. ( Punjab Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

आरोपी महिलेचे पती दीर्घकाळापासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून होते. त्यामुळं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. महिलेला मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणंही अवघड झाले होते. त्यामुळं महिलेने पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी सकाळी मंजीत सिंह हे त्यांच्या पत्नी नरिंदर कौरसोबत रुग्णालयात औषध घ्यायला निघाले होते. त्यानंतर पतीचा मृतदेह रस्त्याच्याकडेला मिळाला. तर पत्नी जखमी अवस्थेत होती. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर महिलेला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येची घटना उघडकीस आली.

punjab crime news woman killed husband for money of lic policy
Flood In Assam: आसाममध्ये पुरामुळे नुकसान, 25 ठार, हजारो एकरांवरील पिके नष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, मंजीत सिंह हे गेल्या २० वर्षांपासून आजाराशी झुंज देत होते. त्यामुळं त्यांच्यावर त्यांच्या घराजवळील रुग्णालयात उपचार सुरू होते. पतीच्या आजारावर अधिक खर्च होत असल्याने महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यामुळे घरात पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचे. सदर महिला ही एलआयजी एजंट होती. तर तिच्या पतीच्या नावावर १५ लाखाची विमा पॉलिसी होती. विमा पॉलिसीची नॉमिनी स्वत: पत्नी होती. त्यामुळं पतीची हत्या केल्यावर पॉलिसीचे पैशे मिळतील, अशी कल्पना पत्नीला सूचली. त्यानंतर पत्नीनं पतीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर सदर महिलेने पतीला रुग्णालयातून औषध घ्यायला जाताना हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी सदर आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com