QR Code For Mango: क्यूआर कोडवरून कळणार आंब्याचं नाव, गाव अन् पत्ता! फसवणूक टाळ्यासाठी भन्नाट प्रयोग

QR Code For Mango: अनेक विक्रेते हापूस आणि इतर आंब्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार घडतात.
QR Code For Mango
QR Code For Mangosaam tv

Malihabadi Mango: आंबा प्रेमींसाठी एक खास बातमी आहे. आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. बाजारात वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची आवक वाढली आहे. अशात अनेक विक्रेते हापूस आणि इतर आंब्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणूकीपासून तुम्ही वाचण्यासाठी एक खास तंत्र विकसित करण्यात आलं आहे. या मुळे तुम्हाला तुमचा आवडता आंबा खरेदी करणे सोपे होणार आहे.

हे नवीन तत्र म्हणजे क्यूआर कोड आहे. या क्यूआर कोडमुळे बाजारात तुम्ही खरेदी करत असलेला अंबा कोणत्या प्रजातीचा आहे आणि त्याचा मूळ मालक कोण आहे हे तुम्हाला कळणार आहे. एवढेच नाही तर हा आंबा कोणत्या बागेतून तोडण्यात आला हेही ग्राहकांना कळू शकणार आहे. यामुळे तुम्हाला तुमचा आवडता आंबा खरेदी करता येईल आणि तुमची फसवणूक होणार नाही.

QR Code For Mango
ED seized Poonawalla properties: ईडीची मोठी कारवाई! झवरेह सोली पूनावाला यांच्या ४१ कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त

फसवणूक टाळण्यासाठी QR कोड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे तंत्र मलीहाबादी आंब्यावर लागू केले जाणार आहे. मलीहाबादी आंब्याला देशात सर्वाधिक मागणी असल्याचे सांगितले जाते. पण अनेक वेळा विक्रेते मलीहाबादी आंब्याच्या नावावर इतर जातीचे आंबे ग्राहकांना विकतात. हापूस अंबाच्या बाबतीतही हेच घडतं. परंतु आता मलीहाबादी आंब्याच्या ग्राहकांना अस्सल अंब्याची चव चाखता येणार आहे. कारण या अंब्यांवर फसवणूक टाळण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. (Latest Breaking News)

QR Code For Mango
KKR VS PBKS IPL Match: शिखर धवनची तुफानी खेळी; पंजाबकडून कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे आव्हान

जिओ टॅगिंगद्वारे हे शक्य होणार

याचा फायदा असा होईल की तुम्ही तुमचा QR कोड वापरताच हा आंबा मलिहाबादी आहे की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल. जर मलीहाबादी आंबा असेल तर तो कोणत्या बागेचा आहे आणि या बागेचा मालक कोण आहे हे देखील तुम्हाला कळू शकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आंब्याच्या झाडांच्या जिओ टॅगिंगद्वारे हे शक्य होणार आहे. मंडी परिषदेने मलीहाबाद येथील मँगो पॅक हाऊस या खासगी कंपनीकडे हे काम सोपवले आहे. या कंपनीला रहमानखेडा येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरने (CISH) निर्यातीचे तंत्रज्ञान दिले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com