QUAD Summit: PM नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार
QUAD Summit: PM नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार

QUAD Summit: PM नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मेरिसन, जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यासह सहभागी होतील

विहंग ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) क्वाड परिषदेत ( QUAD Summit) सहभागी होण्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. क्वाड ही चार देशांची संघटना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (US President Joe Biden) यांनी क्वाड देशांच्या (USA, India, Japan, Australia) नेत्यांच्या भौतिक उपस्थितीसह पहिल्या क्वाड शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. व्हाईट हाऊसने सोमवारी परिषदेबाबत माहिती दिली. चार नेत्यांची ही परिषद 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये होणार आहे.

हे देखील पहा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मेरिसन, जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यासह सहभागी होतील. ही बैठक 24 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे होणार आहे. बैठकीत, नेते 12 मार्च 2021 रोजी झालेल्या बैठकीनंतर प्रगतीचा आढावा घेतील तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील.

QUAD Summit: PM नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार
Oscar Fernandes| ज्येष्ठ काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

क्वाड कॉन्फरन्समध्ये कोविड १९ ,हिंदी पॅसिफिक महासागर , सायबरस्पेस आणि  तंत्रज्ञानावर चर्चा होईल.   भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाईल.  हे देखील महत्त्वाचे आहे की पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी बायडेन यांच्याशी समोरासमोर भेटणार आहेत. कोविड काळात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. त्यापूर्वी ते  बांगलादेशला गेले होते. 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण देखील होऊ शकते.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com