इस्त्रायली आणि भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज 36 वे राफेल जानेवारीत येणार

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल विमानांची (Dassault Rafale) संख्या लवकरच 36 होणार आहे.
इस्त्रायली आणि भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज 36 वे राफेल जानेवारीत येणार
इस्त्रायली आणि भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज 36 वे राफेल जानेवारीत येणार Twitter

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल विमानांची (Dassault Rafale) संख्या लवकरच 36 होणार आहे. फ्रान्स पुढील तीन महिन्यांमध्ये दरमहा 3 राफेल लढाऊ विमाने देणार आहे. यासह, राफेलची शेवटची खेप जानेवारी 2022 पर्यंत भारतात पोहेचेल अशी माहिती समोर आली आहे. राफेल हे 4.5 जनरेशनचे मिड ऑमनी-पोटेंट रोल असलेले लढाऊ विमान आहे. हे दोन इंजिन ने सुसज्ज आहे. ते जमीन तसेच समुद्र हल्ले करण्यास देखील सक्षम आहेत. याशिवाय, ते हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर देखील हल्ला करू शकते.

36 विमानांपैकी 13 विमाने इंडिया स्पेसिफिक एन्हांसमेंट (India Specific Enhancements) सुधारणांनी सुसज्ज आहेत, म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे. आतापर्यंत भारताला दसॉल्ट एव्हिएशनकडून एकूण 26 राफेल विमाने मिळाली आहेत, जी पश्चिम क्षेत्रातील अंबाला आणि पूर्व क्षेत्रातील हाशिमारा येथे कार्यरत आहेत. आणखी तीन दसॉल्ट निर्मित लढाऊ विमाने 13 ऑक्टोबर रोजी जामनगर तळावर उतरणार आहेत.

इस्त्रायली आणि भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज 36 वे राफेल जानेवारीत येणार
जगातील सर्वात सुंदर शहरांची यादी जाहिर; जाणून घ्या संपूर्ण यादी

यूएई हवाई दल फ्रान्समधून येणाऱ्या या विमानांना हवाई मार्गाच्या मध्यभागी इंधन पुरवेल. 13 ऑक्टोबर नंतर, नोव्हेंबरमध्ये तीन तर डिसेंबरमध्ये तीन राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. तथापि, 36 राफेल विमानांपैकी शेवटचे, म्हणजेच 36 वे राफेल लढाऊ विमान ज्यात भारतीय तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे असतील आणि ते सर्वात घातक राफेल विमान असणार आहे. हे विमान भारताच्या विशिष्ट सुधारणांनी सुसज्ज असणार आहे. त्याचे आगमन जानेवारी 2022 मध्ये होणार आहे.

राफेलची वैशिष्ट्ये

36 वे राफेल लढाऊ विमान इस्त्रायली तंत्रज्ञान तसेच भारतीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. 36 वे घातक राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचल्यानंतर, इतर राफेल लढाऊ विमानेही त्याच आधारावर तयार करण्यात येतील. भारताच्या विशिष्ट सुधारणांसह सुसज्ज विमानात रेडिओ अल्टीमीटर, रडार वॉर्निंग रिसीव्हर, लो बँड जॅमर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर, उच्च उंची इंजिन स्टार्ट-अप, सिंथेटिक अॅपर्चर रडार, ग्राउंड मूव्हिंग टारगेट इंडिकेटर अँड ट्रॅकिंग, इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅक यांचा समावेश आहे. क्षेपणास्त्र दृष्टिकोन चेतावणी प्रणाली देखील असणार आहे.

अत्याधुनिक 5 राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप 29 जुलै 2020 रोजी भारतात आली होती, सुमारे चार वर्षांनी भारताने फ्रान्सबरोबर सुमारे 59,000 कोटी रुपये किंमतीच्या 36 विमानांच्या खरेदीसाठी करार केला होता. राफेल कराराअंतर्गत भारताला एकूण 36 लढाऊ विमाने पुरवली जाणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com