पक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही; राहूल गांधी

कॉंग्रेस (Congress) पक्ष सोडणारे आरएसएसचे (RSS) लोक
पक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही;  राहूल गांधी
पक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही; राहूल गांधीSaam tv

नवी दिल्ली : ''आम्हाला निडर लोकांची गरज आहे, कॉंग्रेस (Congress) पक्ष सोडणारे आरएसएसचे (RSS) लोक होते,'' अशा शब्दांत कॉंग्रेस खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर निशाना साधला. आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेस सोशल मीडिया (Social Media) सेलसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना संबोधित केले. यादरम्यान, राहुल गांधींनी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला.

पक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही;  राहूल गांधी
'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न

गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले. ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्याआधी रीता बहुगुणा जोशी, हेमंत बिस्वा शर्मा, जगदंबिका पाल, चौधरी बीरेंदर सिंग, राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे यांच्यासारखे कॉंग्रेस नेतेही कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. यानांही राहुस गांधी यांच्यावरही राहूल गांधी यांनी निशाना साधला आहे.

जे घाबरले आहेत ते जाऊ शकतात. पण जे लोक कॉंग्रेसमध्ये नाहीत आणि त्यांना भीती वाटत नाही, त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत आहे. पक्ष सोडणारे ते लोक आरएसएसचे लोक होते. भाजपने आतापर्यंत पसरवलेल्या फेक बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवणे बंद केले आहे. त्यामुळे आता कोणालाही भाजपाची भीती वाटण्याची गरज नाही. कॉंग्रेसला निर्भय लोकांची गरज आहे. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या लोकांना कॉंग्रेसची गरज नाही. अशा लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी पक्षांतर केलेल्यांना टोला लगावला आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. "सिंधिया जी घाबरले, ते आरएसएसचे झाले, सिंधिया जी घाबरत होते की भाजपा त्यांचा महल, त्यांचे घर घेऊन जाईल, त्यामुळे ते भाजपमध्ये गेले. तर जितिन प्रसाद यांना उद्देशून ते म्हणाले की, आम्हाल निडर लोकांची गरज आहे. जे निडर आहेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन या, पण जे घाबरत आहेत त्यांची आपल्याला गरज नाही. त्यांनी निघून जावे.''

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com