सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीका

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.
सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीका
सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीकाSaam Tv News

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत petrol and diesel price hike कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी congress MP rahul gandhi यांनी केंद्र सरकारवर centr\'al government पुन्हा एकदा निशाण साधला आहे. सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातल्या 17 राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली. याचं मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लिखीत स्वरुपात ही माहिती दिली आहे. rahul gandhi criticises to government about petrol and diesel price hike

2020-21 या वित्तीय वर्षात केंद्र सरकारद्वारे वसुलण्यात येणाऱ्या करात 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही रक्कम 3.35 लाख करोड इतकी आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे 19.98 रुपयांवरुन 32.92 वर गेले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 15.83 वरुन 31.80 रुपयांवर गेले आहे. कोरोनाच्या पहील्या लाटेत वैश्विक लॉकडाउनमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले होते.

हे देखील पहा -

सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीका
आनंददायक! अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता

सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात याव्यात यासाठी कॉंग्रेसचे देशभर आंदोलन सुरु आहे. त्यात आता राहुल गांधींनी पुन्हा सरकारला धारेवर धरले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com