
नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. या विरोधात काँग्रेसने आज दिल्लीत निदर्शन करण्यास सुरूवात केली. निदर्शनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी (Police) काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या निदर्शनासाठी देशभरातून काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. (National herald case news updates)
राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. काही वेळाने राहुल गांधी पक्षाच्या अन्य नेत्यांसह येथून पदयात्रा काढणार आहेत. यानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. (Rahul Gandhi News)
दिल्ली पोलिसांनी काल या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. परवानगीच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा असी मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका करत आरोप केला आहे. ' मोदीजी तुम्ही समजून घ्या, सत्याग्रहला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही झुकणार नाही. ही सत्याची लढाई आहे. ही लढाई सुरुच राहणार आहे, असंही सुरजेवाला म्हणाले.
या आंदोलनासाठी देशभरातून काँग्रेसचे नेते दिल्लीत आले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, पी. चिदंबरम, जयराम रमेश, सचिन पायलट, मुकुल वासनिक, गौरव गोगाई, राजीव शुक्लासह आदी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
‘नॅशनल हेरॉल्ड’ या कंपनीमध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप ईडीने (ED) केला आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांची आज ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. या प्रकरमी सोनिया गांधी यांचीही चौकशी होणार आहे. सोनिया गांधी यांना काल कोरोना संबंधीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.