Rahul Gandhi News : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का; लोकसभा हौसिंग कमिटीने धाडली नोटीस, कारण?

Rahul Gandhi latest News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी रद्द झाल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Saam tv

New Delhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी रद्द झाल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना १२ तुगलक रोड येथील बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लोकसभेच्या हौसिंग कमिटीने यासंदर्भात राहुल गांधींना नोटीस धाडली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल खटल्यात कोर्टानं दोन वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारकी रद्द झाल्यानंतर एका महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा करावा लागतो.

एका अन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल गांधी हे लोकसभेच्या हौसिंग कमिटीस अर्ज करून घर रिकामे करण्यास आणखी अवधी मागू शकतात.

दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. देशभरात काल काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन केलं. तर आज काँग्रेसच्या काही नेत्यांनी काळे कपडे घालून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला.

Rahul Gandhi News
Ajit Pawar News : तसला चावटपणा चालणार नाही, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना का दिली तंबी?

काय आहे प्रकरण?

सूरतमधील एका कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवलं. मोदी आडनावाबद्दलच्या एका टिप्पणी प्रकरणात कोर्टानं हा निकाल दिला. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

मात्र, दोषी ठरवल्यानंतर आणि शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयानं यासंबंधी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com