
Rahul Gandhi Twitter Bio: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासरदारकी रद्द करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतः राहुल गांधी यांनीही मी घाबरणार नाही, लढत राहणार म्हणत भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडून त्यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे... (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये (Twitter Bio) मोठा बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर (Twitter) प्रोफाईलवर अपात्र खासदार असा उल्लेख केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता 'Dis’Qualified MP' असे पाहायला मिळत आहे.
कॉंग्रेस नेते आक्रमक....
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. राजघाटवर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही काँग्रेसकडून आंदोलन होणारच असे सांगण्यात आले आहे.
राज्यातही होणार सत्याग्रह आंदोलन...
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याविरोधात आज काँग्रेसने देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली असताना, राज्यात देखील (Maharashtra Congress) अशाप्रकारे आंदोलन केले जाणार आहे. मुंबई आणि नागपूरमधील आंदोलनात बडे नेते सहभागी होणार आहेत. नागपूरच्या संविधान चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.