Sindhutai Sapkal: त्यांचे व्यापक कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान - राहुल गांधी

सिंधुताई यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.
Rahul Gandhi and Sindhutai Sapkal
Rahul Gandhi and Sindhutai SapkalSaam Tv

नवी दिल्ली - सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा (Wardha) येथे झाला होता. माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. सिंधुताई यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे. (Sindhutai Sapkal Latest News Highlights)

हे देखील पहा -

राहून गांधी यांनी देखील सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विट करत त्यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांनी सांभाळलेल्या अनेक अनाथ मुलांसाठी त्या ‘माई’ म्हणून लक्षात राहील. आदिवासी समाजाच्या हक्क आणि पुनर्वसनासाठी त्यांचे व्यापक कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहील.अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com