Rahul Gandhi Video : माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत - राहुल गांधी

Rahul Gandhi About Savarkar News : पत्रकाराने विदेशातील भाषणाबाबत माफी मागण्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिली.
Rahul Gandhi About Savarkar News
Rahul Gandhi About Savarkar NewsSAAM TV

Rahul Gandhi Press Conference : मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील कोर्टानं दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी आपोआप रद्द करण्यात आली.

लोकसभा सचिवालयानं यासंबंधीत नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध केले आहे. यावनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi About Savarkar News
Rahul Gandhi Press Conference: 'मी घाबरणार नाही, लढत राहणार...' खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा हल्लाबोल; अदानींना वाचवण्यासाठीच...

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा उल्लेख केला. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राहुल गांधी यांना एक प्रश्न विचारला. तुम्ही विदेशात केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी तुम्हाला माफी मागण्यास सांगितले, कोर्टात माफी मागण्यास सांगण्यात आले होते, तुम्ही याबाबत काय विचार करता असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्ना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले. माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.

Rahul Gandhi About Savarkar News
Supreme Court News : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका; कायद्यातील 'त्या' तरतुदीलाच आव्हान

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला. "लोकशाहीवर हल्ला होत असून याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे (Narendra Modi) अदांनीसोबत काय संबंध आहेत आणि ते शेल कंपन्यांचे २०,००० कोटी कोणाचे आहेत? असा प्रश्न मी विचारला होता. तो पैसा अदांनीचा नाही, अन्य लोकांचा आहे. मग ते कुणाचे आहेत, असा प्रश्न मी केला. त्यामुळे माझा आवाज दाबण्यात प्रयत्न करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com