सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात राहुल गांधींचे धरणे; पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप

राहुल गांधी यांच्यासह धरणे देणाऱ्या अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Rahul Gandhi
Rahul GandhiTweeter/@Congress

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं आहे. सोनिया गांधी यांची सलग दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. देशभरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं सुरू केली आहे. यादरम्यान, दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह धरणे देणाऱ्या अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Rahul Gandhi Latest News)

Rahul Gandhi
'सेंट्रल व्हिस्टा'मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र लावा; खासदार राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजय चौकात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

आंदोलनादरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्रींय तपास यंत्रणांना लक्ष केलं. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधींनी महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेलं. (Rahul Gandhi Delhi Police)

दुसरीकडे राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचं राज्य आहे अशी टीका केली. राहुल गांधींवर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरू झाली असल्याचं कळतंय.

दरम्यान, ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. याआधी एकदा सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली असून ही दुसऱी फेरी आहे. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधींदेखील ईडी कार्यालात पोहोचल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्याआधी राहुल गांधीदेखील तिथे पोहोचले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com