
मुंबई: रेल्वे भरती विभागाकडून उत्तर-मध्य रेल्वेमध्ये (Railway) अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२२ आहे.
रेल्वेमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वे भरती विभागाकडून (Railway Recruitment 2022) भरती जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज (Job) मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज (Online Application) करता येणार आहे. इच्छुक किंवा पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrcpryj.org वर भेट देऊन संबंधित पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे.
या भरतीद्वारे (Recruitment ) एकूण १६५९ पदे भरली जाणार आहेत. त्यात फिटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटरसह अनेक ट्रेडच्या पदांचा समावेश आहे. त्यातील ७०३ पदे ही प्रयागराज, ६६० पदे झाशी आणि २९६ पदे आग्राकरिता आहेत.
या पदांसाठी संबंधित उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावेत. तर उमेदवाराचे २४ वर्षांपर्यंत असावे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे.
अधिकृत बेवसाइट rrcpryj.org ला भेट द्या. त्यानंतर अप्रेंटिस भरतीसाठी अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंकवर जाऊन क्लिक करावे. नवीन पेज खुले होईल. त्यात उमेदवारांना आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर रजिस्ट्रेशन होईल. क्रेडेंशियल टाकल्यानंतर लॉग-इन करून अर्ज भरावा. त्यानंतर संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क जमा करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.