रेल्वे स्टेशनवरील क्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप

विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या, ठिणगी मध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रेल्वे स्टेशनवरील क्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप
रेल्वे स्टेशनवरील क्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुपSaam Tv

कोलकाता : विद्युत तारांचे electrical wiring एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या, ठिणगी मध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या Bengal हुगली Hooghly जिल्ह्यामधील श्रीरामपूर Shrirampur रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या सुमारास घडली आहे. गुरुवारी रात्री १० च्या वाजेच्या सुमारास याठिकाणी आग लागली आहे.

हे देखील पहा-

ही घटना इतकी भयंकर होती की हळूहळू आग जंगलाकडे पसरली जात होती. तारांना लागलेल्या आगीने जवळच असलेल्या जंगलाला आपल्या भक्ष्यस्थानी घेतले होते. यानंतर संपूर्ण परिसरामध्ये आगीचे Fire लोट पसरल्याचे यावेळी पहायला मिळाले आहे.

घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी अग्निशमनाच्या २ इंजिनांसह घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे स्टेशनवरील क्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप
Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग

आसपास असणाऱ्या नागरिकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि फोटो शूट केले आहे.यामध्ये आगीचे मोठे रौद्ररुप बघायला मिळाल आहे. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ आणि काही फोटो सध्या व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे. विद्युत तारांमधील घर्षणाने लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने आता परिस्थिती आटोक्यात आणली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com