TTE urinates on woman: टीसीचं ट्रनेमध्ये घाणेरडं कृत्य; प्रवासी महिलेवर केली लघवी

Viral News: ट्रेन लखनौला पोहोचल्यावर प्रवाशाच्या तक्रारीवरून टीटीईला अटक करण्यात आली.
Railway
RailwaySaam Tv

Lucknow News: गेल्या काही दिवसात विमानात प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक बातम्या तुमच्या कानावर आल्या असतील. मात्र आता अशीच एक घटना रेल्वेत घडली आहे. ट्रेनमध्ये टीसीने महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

नशेत असलेल्या टीसीने रविवारी रात्री ट्रेनमध्ये महिलेच्या डोक्यात लघवी केली. अमृतसरहून कोलकाता जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ट्रेन लखनौला पोहोचल्यावर प्रवाशाच्या तक्रारीवरून टीटीईला अटक करण्यात आली.

Railway
Sangli News: सुट्टी नाकारल्याने पत्नीनं झोपून केलेलं आंदोलन राज्यभर गाजलं; आता एसटी प्रशासनाकडून पतीचं निलंबन, कारण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला आपल्या पतीसोबत अकाल तख्त एक्स्प्रेसच्या ए वन डब्यातून प्रवास करत होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या सीटवर आराम करत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टीटीई मुन्ना कुमार याने तिच्या डोक्यात लघवी केली. (Latest Marathi News)

महिलेने आरडाओरड केल्यानंतर प्रवाशांनी टीसीला बेदम चोप दिला. टीटीई नशेत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून टीसीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Railway
ALERT! H3N2 Virus ने टेन्शन वाढवलं; पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले ३३ रुग्ण

चारबाग रेल्वे स्थानकावर टीटीई मुन्ना कुमारला जीआरपी निरीक्षक नवरत्न गौतम यांनी ट्रेनमधून खाली उतरवले आणि प्रवाशाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. टीटीई मुन्ना कुमार सहारनपूरमध्ये कार्यरत आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com