टॅक्सी ड्रायव्हरला भररस्त्यात कानफटवलं, नंतर पट्ट्यानं मारलं; तरुणींच्या गुंडगिरीचा Video व्हायरल

पैसे मागायला गेलेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरला कंपनीमधील महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Viral Video
Viral VideoTwitter

Raipur Viral Video: कंपनीत शिल्लक राहिलेले पैसे मागायला गेलेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरला कंपनीमधील महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील रायपूर (Raipur) येथे घडली असून महिलांनी या तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही मारहाणीची घटना रायपूरच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली असून या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) एका व्यक्तीने शूट केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सात ते आठ महिला तरुणाला जोरात थप्पड मारत आहेत. शिवाय त्याला बेल्टनेदेखील मारहाण करत आहेत.

पाहा व्हिडीओ -

तसंच घटनेतील पीडित तरुण महिलांच्या मारहाणीपासून बचाव करताना दिसतं आहे. मात्र, त्याची कपडे फाटेपर्यंत महिलांनी मारहाण केल्याचं दिसतं आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात रायपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये दोघांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पैसे मागितले म्हणून मारहाण -

Viral Video
KRK RSS News: KRK ला करायचाय RSS जॉईन, भागवतांकडे व्यक्त केली इच्छा; चर्चांना उधाण

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कारचालक म्हणून नोकरी करत होता. मात्र, मे आणि जून महिन्यातील त्याचा पगार मिळाला नव्हता. हा पगार का मिळाला नाही. याबद्दल तो कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेला.

यावेळी त्याने कंपनीच्या मॅनेजरचा नंबर मागितला असता उपस्थित महिलांना त्याला शीवीगाळ करत कंपनीच्या बाहेर घेऊन जात मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय या तरुणाला महिलांनी कपडे फाटेपर्यंत बेल्टने मारहाण केल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com