Crime News : काळजाचा थरकाप उडवणारी घटना; एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू; त्या रात्री नेमकं काय घडलं...

पोलिसांनी कुटुंबातील सहा व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
Rajasthan Crime News
Rajasthan Crime News Saam Tv

Rajasthan News : उदयपूर जिल्ह्यातील गोगुंडा शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एकाच घरातील सहा व्यक्ती मृत पावल्या आहेत. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी गावकऱ्यांनी घरात पाहिले असता चार लहान मुलं आणि एक दांपत्य मृत अवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आसून मृतांचे शव ताब्यात घेतले आहे.

सदर घटना गोगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पोलिसांनी कुटुंबातील (Family) सहा व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. सदर घटना ही हत्येची आहे की, आत्महत्येची या बाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही. गोगुंडा पोलीसांचे एक पथक या घटनेचा तपास करत आहे.

एकाच खोलीत मृतदेहांचा खच

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी त्यांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झाल्यावर दरवाजा उघडताच घरातील दृश्य पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याचे पोलीस म्हणाले. त्या घरात एकाच खोलीत सर्व मृत देह पडले होते. यात पती पत्नी आणि चार निष्पाप मुलं आहेत. पोलिसांनी आता या घराला सिल लावले आहे. प्रकाश प्रजापत वय ३०, त्यांची पत्नी दुर्गाबाई वय २७ यांच्यासह ८ वर्षीय मोठा मुलगा, ५, ३ आणि २ वर्षांची लहान मुले मृत पावली आहेत. सदर घटनेमुळे गावात एकच खळवळ उडाली आहे.

Rajasthan Crime News
Income Tax Raid | देशात आयकर विभागाच्या धाडी दिल्ली,राजस्थान,कर्नाटक,उत्तराखंडात छापे, पाहा व्हिडीओ

प्राथमीक माहितीच्या आधारे सदर घटना आत्महत्येची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रकाश प्रजापत यांनी आधी त्यांच्या चार मुलांना गळफास दिला आणि नंतर पत्नी बरोबर स्वत: गळफास घेतला असावा अशी शक्यता व्यक्त कोली आहे. आख्ख कुटुंब एकाच वेळी संपल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जण शोक व्यक्त करत आहेत. सदर घटनेचा अधिक तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वमाहीती गोळा केली असून ही घटना हत्येची आहे की आत्महत्येची या दोन्ही बाजूंनी तपास सुरू आहे.

Rajasthan Crime News
Junnar News: पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी; पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू

दरम्यान पोलिसांनी गावकऱ्यांच्या चौकशीलाही सुरूवात केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकाश कामानिमित्त बाहेरगावी असायचा. तो नवरात्रीच्या काळातच घरी येत होता. त्यांनंतर पुन्हा तो बाहेरगावी जात होता. मात्र या वेळी नवरात्रीमध्ये घरी आल्यावर तो पुन्हा गेलाच नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. गावात त्याचे कुणाबरोबर वाद होते का? तो कोणत्या संकटात होता का? तसेच कोणत्याही अवैध कामात त्याचा सहभाग होता का? अशा विविध मुद्यांवरून पोलिसांचा शोध सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com