Rajasthan Crime News: जन्मदात्या आईचे भयंकर कृत्य! आधी पोटच्या ४ मुलांना संपवले अन् स्वतःही मृत्यूला कवटाळले

Crime News Update: या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले.
Rajasthan Crime News
Rajasthan Crime NewsSaam tv

Rajsthan Crime News: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये बाडमेर जिल्ह्यात एका आईने पोटच्या चार मुलांची हत्या करत स्वतःही मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच उडाली आहे.

Rajasthan Crime News
Jalgaon News: सोशल मीडियावरील मैत्री, तरुणी तिथेच फसली; लग्नाचं वचन देऊन तरुणाने केलं भलतंच कांड

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या मुलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. उर्मिला असे या महिलेचे नाव आहे.  ही घटना शनिवारी रात्री बाडमेर जवळील बनियावास गावातील आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, मृच झालेल्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना माहिती देण्यात आली असून औपचारिक तक्रार दाखल करण्याची वाट पाहिली जात आहे. तसेच मृतदेहाचे पोर्टमार्टम केलं जाईल तसेच महिलेच्या पतीची देखील चौकशी करण्यात येईल. (Latest Marathi News)

Rajasthan Crime News
Sanjay Raut News: अजितदादांच्या त्या विधानाशी मी सहमत, त्याबद्दल मला खेद वाटतो; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं आणि त्यामुळेच महिलेने मुलांची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती देताना सर्कल स्टेशन ऑफिसर कमलेश कुमार यांनी सांगितले की, बनियावास गावात एका घरात आई आणि तिच्या 4 मुलांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे. स्टेशन ऑफिसर कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिहार बाजूच्या अहवालाच्या आधारे आगाऊ कारवाई केली जाईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com