Rajasthan Politics: लाल डायरीवाले माजी मंत्री राजेंद्र गुढा यांचा शिवसेनेत प्रवेश; मुलाच्या वाढदिवशी सोडला काँग्रेसचा 'हात'

Rajendra Gudha : राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय.
Rajendra Gudha joins Shiv Sena
Rajendra Gudha joins Shiv SenaSaam Tv

Rajendra Gudha Join Shivsena:

राजस्थानच्या राजकारणात मोठी उलथापाल होताना दिसत आहे. तेथील माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. राजेंद्र गुढा यांचा मुलगा शिवम गुढा याचा वाढदिवस होता. राजेंद्र गुढा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उदयपुरवाटी येथील लिबर्टी फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आला होता. या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले होते. मुलाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Latest News on Politics)

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली. बाळासाहेब ठाकरेंनी महिलांसाच्या न्यायासाठी आवाज उठवला होता. गुढा यांना पक्षातून निलंबित केलं गेलं. राजस्थानमधील जनता याचं उत्तर देईल. तुम्ही गुन्ह्याविरोधात आवाज उठवला होता. तुम्ही कोणतीच चुकी केली नाही. तुम्ही मंत्री पदाचा त्याग केला, सत्ता सोडली.

Rajendra Gudha joins Shiv Sena
Rajasthan Political Crisis: 'कॉंग्रेसमधील वाद' चव्हाट्यावर, सचिन पायलट घेणार सोनिया गांधींची भेट

दरम्यान राजस्थान विधानसभेत लाल डायरी घेऊन गेल्याने राजेंद्र गुढा चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधातील आरोपांची यादी आहे. त्या दिवशी त्यांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले होते. काँग्रेस मंत्र्यांनी त्यांच्याकडील लाल डायरी हिसकावून घेतली होती. त्यावेळी राजेंद्र गुढा म्हणाले होते की, त्यांच्याकडे डायरीची दुसरी प्रत देखील आहे. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं.

ज्या दिवशी राजेंद्र गुढा यांनी लाल डायरी राजस्थानच्या विधानसभेत नेली होती, त्यादिवशी तेथील विधानसभेत मणिपूर घटनेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावेळी राजेंद्र गुढा म्हणाले होते की, खरंतर आम्हीच महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरलो आहोत. राजस्थानमध्ये महिलांवरील हत्याचार वाढू लागलेत. मणिपूरऐवजी आपल्या राज्यातील स्थितीकडे लक्ष द्यावे लागेल.

Rajendra Gudha joins Shiv Sena
Eknath Shinde News: महसुली नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

राजेंद्र गुढा हे झुंझुन जिल्ह्यात असलेल्या उदयपूरवाटी येथील आमदार आहेत. ते गुढा गावातील रहिवाशी आहेत. राजेंद्र यांनी आपल्या नावासह गावाचं नाव जोडलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव राजेंद्र गुढा हे नाव पडलं आहे. राजेंद्र गुढा हे २०१८ साली बहुजन समाज पक्षाकडून दुसऱ्यांदा आमदार झाले होते. दरम्यान सचिन पायलट यांच्यासोबत हरियाणाला जाणाऱ्या गटात राजेंद्र गुढाही होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com