Farmer success story: पठठ्याने इंग्लंडमधील मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली; आता शेतीतून वर्षाला कमावतोय १ कोटी रुपये

नवदीप वर्षाला एक कोटी रुपयांची कमाई करतो. त्याला केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊनही त्याचा गौरव केला आहे.
Farmer success story: पठठ्याने इंग्लंडमधील मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली; आता शेतीतून वर्षाला कमावतोय १ कोटी रुपये

New Delhi News : शेती व्यवसाय म्हटलं की, अनेकांच्या नजरेसमोर शेतकऱ्यांच्या हालअपेष्टाच समोर येतात. मात्र, राजस्थानच्या सिरोही येथे राहणारा नवदीप गोलेच्छा याला अपवाद ठरला आहे. नवदीपने लाखो रुपयांच्या नोकरी लाथ मारून शेती करायला सुरुवात केली. नवदीप वर्षाला एक कोटी रुपयांची कमाई करतो. त्याला केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊनही त्याचा गौरव केला आहे. (Latest Marathi News)

पारंपारिक व्यायसायिक कुटुंबातून आलेल्या नवदीप गोलेच्छाने 'फायनान्शियल इकोनॉमिक्स' विषयात इंग्लंडमधून २०११ साली 'एमएससी'च्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमध्येच बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, नवदीपला नोकरीचा कंटाळा आल्यानंतर २०१३ साली नोकरी सोडून भारतात परतला.

Farmer success story: पठठ्याने इंग्लंडमधील मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली; आता शेतीतून वर्षाला कमावतोय १ कोटी रुपये
Biryani ATM : काय सांगता! चक्क एटीएम मशीनमधून पैशांऐवजी गरमागरम बिर्याणी, पाहा या शहरातली हि अनोखी गोष्ट

४० एकर क्षेत्रात सुरू केली शेती

नवदीप भारतात येऊन रिसॉर्ट सुरू करणार होता. त्याचबरोबर त्याने वृक्षारोपण करण्याचा विचार सुरू केला. अखेर शेती (Farming) करण्यावरच शिक्कामोर्तब केला. शेतीत चांगलं करिअर करण्यासाठी त्याने जोधपूरवरून १७० किलोमीटर दूर सिरोही येथे ४० एकर क्षेत्रात शेती व्यवयासाला सुरुवात केली. ३० एकर क्षेत्रात त्याने डाळिंबाचे झाडांची लागवड केली. तर अन्य १० एकरात पपई, सीताफळ आणि लिंबांच्या झाडांची लागवड केली.

नवदीपने सांगितले की, 'लोक टोमणे मारायचे की, परदेशात शिक्षण घेऊन शेतीचा विचार करत आहे. सारं जग गावातील शेती सोडून शहरात जात आहे. मी निर्णय घेतला होता. मला फक्त सिद्ध करायचा होता'.

Farmer success story: पठठ्याने इंग्लंडमधील मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली; आता शेतीतून वर्षाला कमावतोय १ कोटी रुपये
Viral Video : प्रेमात मिळाला मोठा धोका; मग तरुणीने भर चौकात केली ही लाजिरवाणी गोष्ट, व्हिडिओ व्हायरल

नवदीपने सर्वात आधी कृषी विभागाशी संपर्क साधला. माती आणि पाण्याची तपासणी करून घेतल्यानंतर शेती सुरू केली. लागवड केलेल्या झाडांना फळ येऊ लागल्यानंतर निर्यात करण्यासाठी नोंदणी केली. त्यामुळे नवदीपला परदेशात निर्यात करण्याची संधी मिळाली. नवदीप विशेष करून नीदरलँडला अधिक प्रमाणात फळे निर्यात करतो. दरम्यान, फळांच्या निर्यातीतून त्याची वर्षाला १.२५ कोटी रुपये सहज कमाई होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com