राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त

राजीव कुमार रविवारी १५ मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्विकारणार आहेत.
राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त
Rajiv KumarSaam Tv

नवी दिल्ली: राजीव कुमार रविवारी १५ मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्विकारणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. “राज्यघटनेच्या कलम ३२४ च्या कलम (२) नुसार, १५ मे २०२२ पासून राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे. राजीव कुमार यांना शुभेच्छा'' असं ट्विट केलं आहे. (chief election commissioner)

कोण आहेत राजीव कुमार?

राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी,1960 रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली. आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये काम केले आहे.

बीएससी, एलएलबी, पीजीडीएम आणि एमए पब्लिक पॉलिसीचे शैक्षणिक पदवी असलेले राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे.(chief election commissioner)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.