
Jaypur: प्रेमाला वयाचं, जाती- धर्माच कशाचचं बंधन नसते. असे आपण नेहमी ऐकतो. सोशल मीडियावर या वाक्याची प्रचिती आणणाऱ्या अनेक लवस्टोरीही आपल्याला पाहायला मिळतात. कधी परदेशातील मुलीवर जडलेले प्रेम असो किंवा कधी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे असो.
आत्तापर्यंत अशा अनेक प्रेमकथा ऐकल्या असतील. मात्र प्रेमातही काही बंधने असतात, मर्यादा असतात. मात्र राजस्थानमध्ये एक अशी लवस्टोरी समोर आली आहे जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, राजस्थानमध्ये एका व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. तो व्यक्ती आपल्या मुलाच्या पत्नीसह पळून गेला.जेव्हा लोकांना हे समजलं तेव्हा सगळेच शॉक झाले. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानच्या (Rajsthan) बुंदी जिल्ह्यातील सिलोर गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्तीला आपल्या सुनेवरच जीव जडला. आणि तो तिच्यासोबत पळूनही गेला. या तरुणीला सहा महिन्यांची मुलगीसुद्धा आहे. ही घटना समोर येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. वडील पत्नीसह घरातून निघून गेल्याचं मुलाला समजताच मुलाने पोलिसांना माहिती दिली. या फिर्यादीमध्ये वडिलांनी पळून जाण्यासाठी दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले आहे.
पीडित पवन वैरागी यानी वडील रमेश वैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी पत्नीला त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आरोपी रमेशचा यापूर्वीही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा त्याच्या मुलाने केला आहे. शिवाय, त्याचे वडील आपल्या पत्नीची फसवणूक करत आहेत आणि ती निर्दोष आहे, असेही त्याने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.