विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब

यंदाच्या संसद अधिवेशनात सुमारे ३० विधेयके मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, त्यातील वीज दुरुस्ती विधेयकासारख्या महत्त्वाच्या बिलांचा समावेश आहे.
विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब
विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूबtwitter/@Loksabha

Parliament Monsoon Session 2021:

संसदेचे पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच गोंधळाने झाली. लोकसभेत (Loksabha) कॉंग्रेस (Congress), टीएमसी (TMC), बसपा (BSP) आणि अकाली दलाच्या (Akali Dal) खासदारांनी महागाई, शेतकरी आंदोलन आणि इतर प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे लोकसभा दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आली. तर राज्यसभा तासाभरासाठी तहकूब करावी लागली. ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सरकारमधील नवीन मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन देता आली नाही. (The Rajya Sabha and the Lok Sabha have been disrupted due to the confusion of the opposition)

विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब
उत्तरकाशीत ढगफुटीने हाहाकार; ३ मृत्यू

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. कॉंग्रेसचे खासदार महागाईच्या मुद्द्यावरुन तर अकाली व बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर बोलण्यासाठी थेट वेलमध्ये आले. मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु दलित, महिला आणि ओबीसी लोकांना मंत्री बनवने हे विरोधकांना पचलेले दिसत नाही. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टिका केली.

दरम्यान, अभिनेता दिलीप कुमार आणि क्रीडापटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यसभाही एक तासासाठी तहकूब करावी लागली. बऱ्याच दिवसानंतर संसदेच्या या अधिवेशनात विरोधी पक्षांनी महागाई, कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन या मुद्दय़ासह पिगासस स्पायवेअर फोन टॅपिंग प्रकरणी अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला वर सरकारला घेराव घालण्याची रणनीती तयार केली आहे. संसद अधिवेशनात सुमारे ३० विधेयके मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, त्यातील वीज दुरुस्ती विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com