'आधी संसदेत कायदे मागे घ्या आणि मगच...; राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि संयुक्त किसान मोर्चाचे सहसंयोजक राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लगेच परतणार नसल्याचे जाहीर केले आहे.
'आधी संसदेत कायदे मागे घ्या आणि मगच...; राकेश टिकैत
'आधी संसदेत कायदे मागे घ्या आणि मगच...; राकेश टिकैतSaam TV

दिल्ली: केंद्र सरकारने Central Government शुक्रवारी कृषीविषयक कायदे Farm Laws मागे घेण्याची घोषणा केली. पीएम मोदींनी दिल्लीमध्ये Delhi Border आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, तरीही आंदोलन काही संपवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि संयुक्त किसान मोर्चाचे सहसंयोजक राकेश टिकैत Rakesh Tikait यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लगेच परतणार नसल्याचे जाहीर केले आहे.

शेतकरी संयुक्त आघाडी म्हणाले, संसदेत जेव्हा कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाच हे आंदोलन संपेल अशी घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही राकेश टिकैत अजूनही शेतकरी आंदोलन तातडीने संपवण्याच्या मागे घेण्याच्या बाजूने नाहीत. देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता लगेच परतणार नसल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. टिकैत म्हणाले की, सरकार संसदेतील तीनही कृषी कायदे रद्द करेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. एवढेच नाही तर टिकैत यांनी आणखी एक मागणी सरकारसमोर ठेवली आहे. टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांशी पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या इतर समस्यांवर चर्चा करावी.

हा आमचा विजय आहे- किसान मोर्चा
किसान एकता मोर्चाने कृषीविषयक कायदे मागे घेणे हा आपला विजय असल्याचे म्हटले होते. किसान एकता मोर्चाने ट्विट करून म्हटले आहे की, 1 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आमचा विजय झाला आहे. मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली. एकता आणि न्याय हाच यशाचा मार्ग आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com