Ramban Tunnel Collapse: 9 मृतदेह बाहेर काढले; अनेक मजूर अडकल्याची भीती

अपघातग्रस्त भागात भूस्खलन झाल्याने शोध आणि बचाव मोहीम मोहीम कालपासून सुरु आहे.
Ramban Tunnel Collapse
Ramban Tunnel CollapseSaam TV

जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याने आतापर्यंत नऊ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत अजूनही अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळपासून पुन्हा ऑपरेशन सुरू करण्यात आले. प्रशासनाने आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले आहेत. अपघातग्रस्त भागात भूस्खलन झाल्याने शोध आणि बचाव मोहीम मोहीम कालपासून सुरु आहे. (Ramban Tunnel Collapse Updates)

या मोहिमेची माहिती देताना बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मजूर वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. गुरुवारी, रात्री 10.15 च्या सुमारास, रामबनमधील खूनी नाल्याजवळ महामार्गावर T3 बोगदा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना वाचवण्यात यश आले. रामबनचे उपायुक्त मसरत इस्लाम यांनी सांगितले की, आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, रामबनचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, एका मोठ्या दगडाखाली आणखी एक मृतदेह दिसला आहे. दगड काढून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मशिन बसवण्यात आल्या आहेत. आम्ही लवकरच हे बचावकार्य संपवू. ढिगाऱ्याखाली अजूनही 7-8 जण अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ऑपरेशन सुरू असून शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत ते सुरूच राहणार आहे.

एनडीआरएफ-एसडीआरएफची टीम बचाव कार्यात

अधिका-यांनी सुधीर रॉय (31) असे मृत मजुराची ओळख पटवली आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम यांनी ट्विट केले की, "खूनी नाला ऑडिट बोगद्यात नऊ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि शोध मोहीम शनिवारी पहाटेपासून सुरू करण्यात आली आहे, जी अजूनही सुरू आहे. या मोहिमेत एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा सहभाग आहे.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामसू पोलिस स्टेशनचे प्रभारी, नैमुल हाल यांच्यासह 15 बचावकर्ते शुक्रवारी संध्याकाळी भूस्खलनात थोडक्यात बचावले. या घटनेनंतर बचावकार्य थांबवण्यात आले. दगड पडणे, जोरदार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे ऑपरेशन मागे घेण्यात आले आणि आज सकाळीच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी न्यायदंडाधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत, असे त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com