...तो एक दिन हम कर देंगे आपको नंगा - आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ

खासदार रामदास आठवलेंनी राज्यसभेत काल सादर केलेल्या कवितेमुळे गोंधळ निर्माण झाला. विरोधकांनी आठवलेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
...तो एक दिन हम कर देंगे आपको नंगा - आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ
...तो एक दिन हम कर देंगे आपको नंगा - आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत गोंधळRajyasabha Tv

नवी दिल्ली : खासदार रामदास आठवले (MP ramdas athawale) आपल्या कवितांमुळे (Funny Poem) नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कविता लोकांना खळखळून हसवतात. पण अनेकदा त्याच्या कवितेच्या अतिरेकामुळे त्यांच्यावर टीकाही होत असते. खासदार रामदास आठवलेंनी राज्यसभेत (Rajyasabha) काल सादर केलेल्या कवितेमुळे गोंधळ निर्माण झाला. विरोधकांनी आठवलेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यामुळे सभापती सस्मित पात्रा यांना असंसदीय शब्द संसदीय कामकाजाच्या रेकॉर्डमधून वगळले जातील असं आश्वासन विरोधकांना दिलं. (ramdas athawale funny poem in indian parliament)

हे देखील पहा -

संसदेत पावसाळी अधिवेशनाचं शेवटचं सत्र सुरु होतं. लोकसभेत १२७ वे विधेयक संमत झाल्याने राज्यसभेत त्यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान खासदार रामदास आठवलेंना बोलायची संधी मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम मोदी सरकारचे (Modi Government) आभार मानले. त्यानंतर त्यांनी आपल्या कवितेच्या शैलीत कॉंग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला.

खासदार रामदास आठवलेची कविता

मेरा बहुत ही आनंदित है मन, क्योंकि पास हो रहा है 127 वां संशोधन

बहुत खुश हो जाएंगे अब ओबीसी जन, आ गया है अब वह क्षण

जो करती है कांग्रेस और विपक्षी दलों पर वार, वह है मोदी सरकार

2024 में मोदी जी के लिए खुल जाएगा सत्ता का द्वार

विरोधी दल रोज बोल रहे हैं हाय-हाय, पर मोदी जी दे रहे हैं सबको सामाजिक न्याय

जनता आपको 2024 में कह देगी बाय-बाय, फिर हम कांग्रेस को कहेंगे हाय-हाय

आप रोज करते हैं हाउस में दंगा तो एक दिन हम आपको कर देंगे नंगा, मोदी जी से मत लो आप पंगा...

...तो एक दिन हम कर देंगे आपको नंगा - आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ
आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी

आठवलेंच्या कवितेतील अनेक शब्दांवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. तेव्हा अध्यक्षांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. सोबतच आठवलेंच्या कवितेतील असंसदीय शब्द संसदीय कामकाजाच्या रेकॉर्डमधून वगळले जातील असं आश्वासन विरोधकांना दिलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com