अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' गायब

अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रशियन रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' (Ransomware Group REvil)अचानक गायब झाला आहे.
अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' गायब
अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' गायबSaam Tv

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणी केल्याने त्याचा फायदा दिसायला लागला आहे. अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रशियन रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' (Ransomware Group REvil)अचानक गायब झाला आहे. अमेरिकेत एकामागून एक सायबर हल्ले होत होते. या हमल्यामध्ये प्रमुख तेल पाईपलाईन आणि शेकडो कंपन्या बळी पडल्या होत्या.

ताजा हल्ला मांस उत्पादक कंपनी जेबीएसवर झाला होता. ज्यामध्ये एक कोटी दहा लाख डॉलर्स (८२ कोटी) खंडणी मागितली गेली. जो बायडन यांनी या घटनेसंदर्भात पुतीन यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी रशियाला रॅन्समवेअर हल्ला करणार्‍या ग्रुप रेव्हिलबद्दलही संपूर्ण माहिती दिली. रेविल हे नाव रॅन्समवेअर एविलपासून घेतले गेले आहे.

बायडन यांनी पुतीन यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर काही दिवसांनंतर रेव्हिल गट निष्क्रिय झाला आहे. डार्क वेबवरुण या ग्रुपच्या साईट गायब झाल्या आहेत. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की हे सर्व कसे आणि कोणी केले. रेव्हिलचे कार्य पुन्हा सुरू होईल की नाही, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. या समूहातील रॅन्समवेअर हल्लेखोर वेगळ्या नावाखाली पुन्हा सक्रिय होऊ शकतात अशी तज्ञांची भीती आहे. रेव्हिल हे आत्ता बंद झाल्याने बायडेन आणि पुतीन समस्या सोडवण्याचे काम करीत असल्याचे सांगण्याची संधी नक्कीच मिळाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com