
Ratan Tata Instagram: फक्त भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात उद्योग जगतातील सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून रतन टाटा यांचे नाव घेतले जाते. रतन टाटा भारतातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते टाटा उद्योग समूहाचे (Tata Group) सर्वेसर्वा आहेत. मिठापासून ते आलिशान गाड्यांपर्यंत प्रत्येक वस्तूची निर्मिती टाटा उद्योगांमधून केली जाते.
रतन टाटा (Ratan Tata) सोशल मीडियापासून लांब राहत असले तरी त्यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. तन टाटा यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सची संख्या जवळपास ८.५ मिलियन इतकी आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचे इन्स्टाग्रामवर एवढे फॉलोवर्स असतानाही ते फक्त एकाच खास अकाउंटला फॉलो करतात. त्यामुळे रतन टाटा इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेली तो खास युजर कोण आहे जाणून घेऊ…
उद्योग जगतात यशाचे शिखर गाठणारे रतन टाटांनी सामाजिक क्षेत्रातही त्यांची खास ओळख निर्माण केली आहे. तरुणांना प्रेरणा देणाऱ्या रतन टाटांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या व्यक्तीमत्वाची खास ओळख करुन देतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. यापैकीच एक विशेष बाब म्हणजे रतन टाटा इंस्टाग्रामवर फक्त एकाच अकांउटला फॉलो करतात. आणि ते अकाउंट आहे टाटा ट्रस्ट (Tata Trust) या धर्मादाय संस्थेचे..
काय आहे टाटा ट्रस्ट संस्था....
टाट ट्रस्ट संस्थेची स्थापना १९१९ मध्ये झाली असून ही रतन टाटा यांच्या मालकीची आहे. कल्याणकारी कामांसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. टाटा समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स ही प्रमुख गुंतवणूकदार आहे. तिचा ६६ टक्के हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या शेअरचा लाभांश टाटा ट्रस्टला येतो जेणेकरून धर्मादाय निधीची कमतरता भासू नये.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रात काम केले जात आहे.
रतन टाटा तीन वर्षापुर्वी इंस्टाग्रामवर सक्रिय झाले होते. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे फॉलोवर्स वाढले. या अकांउंटवरुन ते त्यांच्या बालपणातील, तसेच आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. रतन टाटा त्यांच्या दानशूर वृत्तीसाठी जगभरात ओळखले जातात. म्हणूनच त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशीही मागणी नेहमीच होताना दिसत असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.