RBI On Rs 1000 Note : 2000 ची नोट बंद, आता 1000 रुपयांची नोट पुन्हा येणार?, RBI गव्हर्नर म्हणाले...

RBI On Rs 1000 Note : RBI ने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
RBI Interest Rate Hike
RBI Interest Rate HikeSaam Tv

RBI On Rs 1000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात केल्या आहेत. मात्र 2000 हजारची नोट बंद झाल्यानंतर 1000 रुपयांची नोट परत येणार का? असा प्रश्न आता समोर येत आहे. याबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

RBI 1000 रुपयांची नोट परत आणण्याचा विचार करत नसल्याचे RBI च्या गव्हर्नर यांनी स्पष्ट केले आहे. 1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, दास यांनी उत्तर दिले की हा सर्व अंदाज आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही.

RBI Interest Rate Hike
2000 Rupees Notes: 2000 ची नोट बंद का केली? स्वतः RBI गव्हर्नर यांनीच केला मोठा खुलासा, नागरिकांना म्हणाले...

नोव्हेंबर 2016 मध्ये, RBI ने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. मात्र आता ही 2000ची नोट बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये 2000 च्या नोटा जमा किंवा बदलून मिळतील. उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 10 लाख कोटी रुपये एका रात्रीत गायब झाले होते. त्याची भरपाई म्हणून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. (Latest Marathi News)

सध्या इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून 2000 रुपयांच्या नोटांचा उद्देशही पूर्ण झाला आहे. त्यामुळे 2018-19 मध्ये त्याची छपाईही थांबवण्यात आली होती, असं आरबीआयने स्पष्ट केलं.

नोटा बदलण्यासाठी घाई करु नका

2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणालाही घाई करण्याची गरज नाही. आता बँकांमध्ये गर्दी करण्याचे कारण नाही. आपल्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच चार महिन्यांची वेळ आहे, असं आवाहनही शक्तीकांत दास यांनी केलं आहे.

RBI Interest Rate Hike
2000 Notes Exchange Process : SBI कडून नवं अपडेट ! कशी असेल 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

अर्थव्यवस्थेवर होईल का?

2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल का याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, 2000 रुपयांच्या नोटा चलनात असलेल्या एकूण चलनाच्या केवळ 10.8 टक्के आहेत. त्यामुळे याचा फार कमी परिणाम होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com