
वृत्तसंस्था: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केला आहे. यानंतर अनेक बँकांनी (bank) रेपो दर आधारित व्याजदर (EBLR) वाढवले आहेत. ICICI बँकेने ८.१० टक्के आणि बँक ऑफ बडोदाने ६.९० टक्के केले आहे.
हे देखील पाहा-
व्याजदरवाढीची घोषणा
बँक ऑफ इंडिया (Bank of India) व बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनीही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करून ४.४० टक्के करण्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांनी हा निर्णय घेतला आहे.
कर्जे महाग होणार
EBLR वाढल्याने ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृहकर्ज महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, 'रेपो दरासोबत आयसीआयसीआय-ईबीएलआर बदलले जात आहे. तो आता ८.१० टक्के होणार आहे. त्याची अंमलबजावणी ४ मे पासून करण्यात येणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने व्याजदरात बदल केला आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले की, 'किरकोळ कर्जासाठी लागू असलेले BRLLR ५ मे २०२२ पासून ६.९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामध्ये RBI चा ४.४० टक्के रेपो रेट आणि २.५० टक्के 'मार्कअप' समाविष्ट आहे.
बँक ऑफ इंडियाने ५ मे २०२२ पासून रेपो दरात बदल करून RBLR ७.२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सेंट्रल बँकेनेही RBLR ०.४० टक्क्यांनी वाढवून ७.२५ टक्के केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.