
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा जगभरातील अनेक देशांना आर्थिक फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. पहिला लॉकडाऊन (Lockdown) आणि नंतर कमी कालावधीचे लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. देशाची अर्थव्यस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी १५ वर्षे लागतील असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालात म्हटले आहे.
आरबीआयने (RBI) नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी १५ वर्ष लागतील असा अंदाज आरबीआयने या अहवालात व्यक्त केला आहे. हा अहवाल भारतीय अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र दाखवते.
येत्या काही वर्षांतील संभाव्य विकासदर आणि ‘जीडीपी’ची वाढ लक्षात घेता, सर्व तोटा भरून निघण्यास वर्ष २०३५ उजाडेल अशी शक्यता या अहवालात वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च’ची मते यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
Edited By - Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.