RBI Withdraw Rs 2,000 Notes : देशात पुन्हा नोटबंदी? 2 हजारांची नोट चलनातून बाद होणार; आरबीआयने घेतला मोठा निर्णय

RBI Big Announcement: देशात पुन्हा नोटबंदी? 2 हजारांची नोट चलनातून बाद होणार
RBI to withdraw Rs 2,000 currency notes
RBI to withdraw Rs 2,000 currency notesSaam Tv

RBI announcement today: भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २००० रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येतील.

RBI to withdraw Rs 2,000 currency notes
Viral VIdeo: एसयूव्हीची डिलिव्हरी मिळताच शोरूममध्ये नाचू लागलं संपूर्ण कुटुंब! आनंद महिंद्रा म्हणाले...

RBI Decision on 20000 note: २० हजारांपर्यंत नोटा बदली केल्या जाऊ शकतात

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२३ पासून कोणत्याही बँकेत २००० रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा २०,००० रुपये आहे.  (Latest Marathi News)

RBI withdraws Rs 2,000 bank notes: २०२१-२२ मध्ये २००० रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही

रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात २००० रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१९-२०, आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २००० रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात २००० रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.

RBI to withdraw Rs 2,000 currency notes
Mumbai Nalesafai News: पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची एकनाथ शिंदेकडून पाहणी, मुख्यमंत्री स्वत: नाल्यात उतरले

दरम्यान, २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी केल्यानंतर २००० रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात २००० रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून २००० रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com