RBI Decision on Rs 2000 Note: 2000ची नोट असणाऱ्यांकडे काय पर्याय आहेत? नीट समजून घ्या

बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलता येणार आहेत.
Rs 2000 Notes/file
Rs 2000 Notes/fileSAAM TV

RBI Decision on 2000 Note: भारतीय रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने याबाबत सांगितलं की, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2000 रुपयांची नोट चलनात बंद होईल मात्र 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलता येणार आहेत.

ज्यांच्याकडे 2000 नोटा आहेत त्यांच्यासमोरील पर्याय काय?

>> 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

>> बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँका याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करतील.

Rs 2000 Notes/file
Mumbai Nalesafai News: पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची एकनाथ शिंदेकडून पाहणी, मुख्यमंत्री स्वत: नाल्यात उतरले

>> 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

>> ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  (Latest Marathi News)

Rs 2000 Notes/file
RBI Withdraw Rs 2,000 Notes : देशात पुन्हा नोटबंदी? 2 हजारांची नोट चलनातून बाद होणार; आरबीआयने घेतला मोठा निर्णय

>> 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांची देवाणघेवाण करता येईल.

>> RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com