केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट
केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्टSaam Tv

केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट

शनिवारी रात्रीपासून केरळच्या काही भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांना रविवारसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला

वृत्तसंस्था : शनिवारी रात्रीपासून केरळच्या काही भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांना रविवारसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. केरळमध्ये याअगोदर आलेल्या पुरामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, जोरदार पावसाने भूस्खलन आणि अन्य धोकादायक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन आणि जनतेने अति सावधान राहावेत.

हे देखील पहा-

पूरप्रवण आणि भूस्खलन होणाऱ्या भागात लोकांना सुरक्षित ठिकाणी किंवा जवळच्या मदत छावण्यात पाठविण्यात यावे. मुख्यमंत्री विजयन यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे साबरीमला या ठिकाणी श्री अय्यप्पा मंदिर दर्शनाकरिता पुढील ३ ते ४ दिवस भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट
Latur : एकाच झाडाला गळफास घेऊन शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा

जोरदार पावसामुळे केरळ मधील विविध धरणांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. यामुळे सरकारने चेरुथोनी धरणाचा एक दरवाजा काल दुपारी उघडण्यात आला आहे. केरळचे जलसंसाधन मंत्री रोशी ऑगस्टिन यांंनी फेसबुकवर पोस्टमध्ये सांगितले आहे की, केरळच्या दक्षिण भागात जोरदार पावसामुळे धरणामधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा एक दरवाजा ४० सेंटीमीटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com