दिल्लीतील लाऊडस्पीकर हटवा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे केजरीवालांना पत्र

'लाऊडस्पीकर हा कोणत्याही धर्माचा भाग नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. दिल्लीत ध्वनी प्रदूषण शिगेला पोहोचले आहे.'
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam TV

दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थावरील भाषणामध्ये त्यांनी उपस्थित केलेला लाऊडस्पीकरच्या मुद्यावरुन नव्याने सुरु झालेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. उत्तरप्रदेश सरकारने देखील त्यांच्या राज्यातील भोंग्यावर कारवाई केली. असतानाच आता दिल्लीतील भाजपचे (BJP) अध्यक्ष आदेश गुप्ता (Aadesh Gupta) यांनी देखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आदेश गुप्ता म्हणाले, आम्ही काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. तसंच लाऊडस्पीकर हा कोणत्याही धर्माचा भाग नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. दिल्लीत ध्वनी प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. अनेक राज्यांनी धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घेतला असून जनतेने त्याचे स्वागत केले आहे. तसंच लाऊडस्पीकरच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांना व आजारी नागरिकांना ग्रासलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, याआधी भाजप खासदार परवेश साहिब सिंग वर्मा यांनी सोमवारी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि महानगरपालिकांना पत्र लिहून उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर लाउडस्पीकर काढून टाकण्यासाठी किंवा त्या धार्मिक स्थळांवरील आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

महाराष्ट्रात गृहविभागाचा अलर्ट -

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गृहखात्याने सावध भूमिका घेतली असून आज गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By -Jagdish Patl

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com