FD Rate Hike : 'या' बँकांच्या ठेवींवर मिळणार अधिक व्याज

FD Rate Hike : खासगी क्षेत्रातील बँकांनी 'एफडी'वरील व्याजदर वाढवून द्यायला सुरूवात केली आहे.
FD Rate Hike : 'या' बँकांच्या ठेवींवर मिळणार अधिक व्याज
repo rate hike due to impact on fd rate in india saam tv

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने या आठवड्यात 'रेपो दर' वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बँकांच्या व्याजदरांवर झाला आहे. या निर्णयामुळे बँकेने गृहकर्ज (home loan) आणि अन्य कर्जांवरील व्याजदर वाढविले आहेत. मात्र, दुसरीकडे 'एफडी'मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यामुळे काही खासगी क्षेत्रातील बँकांनी (Bank) 'एफडी'वरील व्याजदर वाढवून द्यायला सुरूवात केली आहे.

हे देखील पाहा -

'एफडी'वर मिळणार इतके व्याज

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने 'एफडी' (FD) व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. या व्याजदरांचा लाभ हा २ कोटींपासून कमी रक्कमेच्या सर्व ठेवींवर मिळणार आहे. बँकांनी व्याजदरांची ही वाढ ६ मेपासून सुरू केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ३९० दिवसांच्या ठेवींवरील व्याजदर ०.३५ टक्क्यांवरून ५.५ टक्के केली आहे. तसेच २३ महिन्यांच्या ठेवींवर ०.३५ टक्के व्याज वाढवून ५.६ टक्के मिळणार आहे.

'या' लोकांना मिळणार ०.५० टक्के जास्तीचे व्याज

बँकेच्या स्टेटमेंटमधील माहितीनुसार, ३६४ दिवसांच्या ठेवींवर ५.२५ टक्के व्याजदर मिळेल. तसेच ३६५ दिवस आणि ३८९ दिवसांच्या ठेवींवर ग्राहकांना ५.४ टक्के व्याजदर मिळेल. जेष्ठ नागरिकांना बँकेकडून अधिक प्रमाणात व्याजदरांचा लाभ द्यायला सुरूवात केली आहे.

तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या ठेवींवर इतर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्के जास्तीचे व्याज मिळणार आहे.

repo rate hike due to impact on fd rate in india
RBI चे नवे नियम; PPF, EPF, EMI, FD वर होणार 'हे' परिणाम

'या' बँकांनी देखील वाढवले व्याजदर

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank)देखील ५ मेपासून 'एफडी' दरांमध्ये वाढ केली आहे. या बँकेने २ कोटींपासून ५ कोटीपर्यंत सर्व ठेवींवरील व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. तसेच बँकेने १८५ ते २१० दिवसांच्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये ३.७५ पर्यंत वाढ केली आहे. तर २७१ ते २८९ दिवसांच्या ठेवींमध्ये ग्राहकांना ४ टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. याचबरोबर याआधी बँकेने २ कोटी रक्कमेच्या व्याजदरांहून कमी एकल ठेवींवर २० जानेवारी रोजी व्याजदरांमध्ये बदल केले होते.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.