Republic Day 2022: राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' आज निवृत्त

भारताच्या माजी राष्ट्रपतींना तसेच विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानाने औपचारिक परेडमध्ये घेऊन जाण्याचा मान विराटला होता.
Republic Day 2022: राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' आज निवृत्त
Republic Day 2022: राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' आज निवृत्तSaam TV

भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या ताफ्यातील विशेष घोडा 'विराट'ला राष्ट्रपतींच्या अंगरक्षक म्हणून विशेष सन्मान दिला आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यात समाविष्ट असलेला हा घोडा आज निवृत्त झाला आहे. प्रजासत्ताक दिनाचा 73 वा सोहळा राजपथ येथे संपला, राष्ट्रपतींचे अंगरक्षक (PBG) राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात घेऊन गेले. PBG मध्ये विराट या खास घोड्याच्या उपस्थितीने हा सोहळा खास बनवला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विराटच्या डोक्यावर थोपटून त्याला निरोप दिला.

15 जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी चीफ स्टाफच्या प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले. असाधारण सेवेसाठी आणि क्षमतेसाठी प्रशंसा मिळवणारा विराट हा पहिला घोडा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर PBG ने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली. या कार्यक्रमात घोडा 13 वेळा यशस्वीपणे सहभागी झाला आहे. भारताच्या माजी राष्ट्रपतींना तसेच विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानाने औपचारिक परेडमध्ये घेऊन जाण्याचा मान विराटला होता.

Republic Day 2022: राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' आज निवृत्त
अरं बाबवं ! एवढा पैसा, नुसत्या गाड्या जरी विकल्या तरी घेतील अनेक देश विकत

2003 मध्ये सुरक्षा ताफ्यात सामील

परेड दरम्यान विराट हा सर्वात विश्वासू घोडा मानला जातो. हॅनोवेरियन घोडा 2003 मध्ये अंगरक्षक म्हणून ताप्यात जोडला गेला. त्याला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा "चार्जर" असे संबोधले जाते. हा घोडा त्याच्या नावानुसार अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक आहे. हा घोडा 2003 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी हेमपूर येथील रिमाउंट ट्रेनिंग स्कूल मधून राष्ट्रपतींच्या सेवेसाठी आणण्यात आला होता आणि लवकरच त्याने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणजे भारतीय सैन्यातील सर्वात उच्च रेजिमेंट आहे. ज्यांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. 200 सैनिकांचे मजबूत घोडदळ, शतकानुशतके ब्रिटीश व्हाइसरॉयपासून आधुनिक काळापर्यंत राज्य प्रमुख, भारतातील सर्वोच्च VIP यांना सोपवण्यात आले आहे. विराटबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की घोड्याने 2021 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेड आणि बीटिंग द रिट्रीट समारंभात म्हातारा असूनही उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारताचे माजी राष्ट्रपती प्रनव मुखर्जी यांनाही परेडमध्ये आणण्याचा मान विराटला मिळाला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com