Republic Day 2023: संविधानाने आपल्याला दिले आहेत हे महत्त्वाचे अधिकार, तुम्हाला माहिती हवेच!

Republic Day 2023: भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. परंतु अनेकांना संविधानातील या अधिकांरांविषयी माहिती नसते.
fundamental rights given by Indian constitution
fundamental rights given by Indian constitution SAAM TV

Republic Day 2023: २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आले आणि तेव्हापासून देशात लोकशाही स्थापित झाले. संविधानात (Indian constitution) देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. परंतु अनेकांना संविधानातील या अधिकांरांविषयी माहिती नसते. गुरुवारी २६ जानेवारी रोजी देशात ७४वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया संविधानात देशातील नागरिकांना कोणते अधिकार देण्यात आले आहेत.

fundamental rights given by Indian constitution
Republic Day 2023: यंदा कितवा प्रजासत्ताक दिन? पहिला प्रजासत्ताक दिवस कधी साजरा झाला?

स्वतंत्र्याचा अधिकार

संविधानातील कलम 19 ते 22 मध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील कोणताही नागरिक आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्रपणे काम करू शकतो. परंतु ते काम बेकायदेशीर नसावे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे समाजातील कायदा-व्यवस्था बिघडता कामा नये. या कलमांतर्गत देशातील नागरिकांना राहणे, खाणे, पेहराव आणि लोकांची मदत करण्याचे स्वांतत्र्य आहे.

समानतेचा अधिकार

भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. अशा परिस्थितीत बंधुभाव वाढवण्यासाठी आणि जातिभेद संपवण्यासाठी प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. संविधनात कलम 14 ते 18 मध्ये हा अधिकार देण्यात आला आहे. अस्पृश्यतेसारखी प्रथा संपवण्यासाठी हा अधिकार देण्यात आला आहे.

fundamental rights given by Indian constitution
Republic Day 2023: यंदा प्रजासत्ताक दिनी खास आकर्षण! कर्तव्यपथवरील परेडमध्ये दिसणार प्रवासी ड्रोन

धार्मिक स्वतंत्र्य

संविधानातील कलम 25 ते 28 मध्ये प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या धर्मानुसार आवडीच्या देवी-देवतांची पूजा-अर्चा करण्याचा अधिकार आहे. घटनेतील कलम 27 नुसार कोणत्याही नागरिकाकडून विशिष्ट धर्म किंवा धार्मिक संस्थेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कोणताही कर वसूल केला जाणार नाही.

शिक्षणाचा अधिकार

राज्यघटनेच्या कलम 29 आणि 30 मध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारांतर्गत कुणालाही शिक्षण देताना भेदभाव केला जाणार नाही आणि सर्वांना समान शिक्षण मिळेल. याशिवाय 86 वी घटनादुरुस्ती कायदा 2002 कलम 21(A) संविधानात जोडण्यात आला आहे. याला शिक्षण हक्क कायदा म्हणतात. या अधिकारांतर्गत देशातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com