३ वर्षांपुर्वींची पैशांने भरलेली बॅग केली परत; मासे विक्रेत्याच्या प्रामाणिकपणाची अनोखी गोष्ट

नागेंद्र कुमार हायस्कूलचे शिक्षक चंपक नंदी हे ३ वर्षांपूर्वी आपली पैशांने भरलेली बॅग एका बाजारात हरवले होते.
Bag Of Notes
Bag Of NotesSaam TV

मुंबई : आपण अनेकवेळा प्रामाणिकपणाच्या घटना ऐकल्या आहेत, मात्र एका मासेवाल्याने ३ वर्षापर्यंत एका व्यक्तीची पैशांनी भरलेली बॅग जपून ठेवल्याची घटना समोर आली आहे. आपणाला सध्याच्या काळात कोणीतरी एवढं प्रामाणिक असेल यावरती विश्वास बसणार नाही. मात्र, पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर २४ परगणा येथील बशीरहाटमधील एका मासे विकणाऱ्या व्यक्तीने हे प्रामाणिकपणाचं अनोखं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

मासे विक्रेते मोहम्मद अबू काशेम गाझी यांना ३ वर्षांपूर्वी रस्त्यावर नोटांनी भरलेली बॅग (A bag full of notes) सापडली होती. त्यांनी ही बॅग आपल्या घरी जपून ठेवली होती. कधीतरी या बॅगचा मालक तिच्या शोधात येईल त्यावेळी त्याला आपण ही पिशवू देवू असं त्यांनी ठरवलं होतं आणि अखेर जवळपास ३ वर्षांनी या पैशांचा खरा मालक सापडला आणि या मासे विक्रेत्याने त्यांची पैशांनी भरलेली बॅग परत केली.

बशीरहाटमधील डांडेरहाटच्या नागेंद्र कुमार हायस्कूलचे (HighSchool) शिक्षक चंपक नंदी हे ३ वर्षांपूर्वी आपली पैशांची बॅग एका बाजारात हरवले होते, त्यांनी या बॅगचा खूप शोध घेतला मात्र अनेक ठिकाणी ही बॅग शोधूनही त्यांना सापडली नाही. यानंतर चंपक यांनी आपली बॅग कधीतरी परत मिळेल ही आशा सोडली होती. ते या बॅगबाबत विसरुन देखील गेले होते.

हे देखील पाहा -

मात्र मासे विक्रेता (Fish Seller) हा प्रसंग विसरला नव्हता त्यांने सांगितलं की, त्या दिवशी बाजारात गर्दी होती त्यावेळी त्याच्या दुकानाजवळ कोणीतरी बॅग ठेवल्याचे त्यानं बघीतलं होतं. अनेक दिवस शोध घेऊनही त्या बॅगचा मूळ मालक सापडला नाही तेव्हा अबूने बॅग घेऊन सोबत ठेवली.

त्या बॅगेत 70 हजार रुपये होते, त्यात नोटांचे बंडल ठेवले होते. त्याने ती बॅग पत्नीला ठेवण्यासाठी दिली, त्यानंतर लॉकडाऊनमध्ये या मासे विक्रेत्याचे काम बंद होते पैसे जवळ नव्हते तरी देखील त्याने या पैशाला हात लावला नव्हता आणि त्या बॅगच्या खऱ्या मालकला त्यानी ही बॅग प्रामाणिकपणे परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात असून पोलिसांनी देखील अबू यांचा सत्कार केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com