‘रिव्हॉल्व्हर’ फिरवत रिल्स करणं पडलं महागात; अखेर ‘त्या’ महिला पोलिसाचा राजीनामा मंजूर

प्रियांका मिश्राचा राजीनामा मंजूर
‘रिव्हॉल्व्हर’ फिरवत रिल्स करणं पडलं महागात; अखेर ‘त्या’ महिला पोलिसाचा राजीनामा मंजूर
‘रिव्हॉल्व्हर’ फिरवत रिल्स करणं पडलं महागात; अखेर ‘त्या’ महिला पोलिसाचा राजीनामा मंजूरSaam Tv

नवी दिल्ली - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल Viral Video झाला होता. महिला कॉन्स्टेबल प्रियंका मिश्राला हा एक व्हिडिओ करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. कारण तिला आपली नोकरी गमवावी लागली असून प्रियांका मिश्राचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

इन्स्टाग्रामवर Instagram युनिफॉर्ममध्ये या महिला कॉन्स्टेबलने ‘रिव्हॉल्व्हर’ फिरवत रील तयार केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर social Media प्रियांकाला ट्रोल करण्यात आले. ज्यामुळे अस्वस्थ होऊन या महिला कॉन्स्टेबलने राजीनामा Resigned दिला असून तिचा आता राजीनामा आता मंजूर करण्यात आला आहे.

‘रिव्हॉल्व्हर’ फिरवत रिल्स करणं पडलं महागात; अखेर ‘त्या’ महिला पोलिसाचा राजीनामा मंजूर
टाकळी गावात कोरोना लसीकरणाच्या देखाव्यात गौराईची स्थापना...

प्रियांकाचा युनिफॉर्ममध्ये असताना हातात रिव्हॉल्व्हर धरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिची स्टाईल अगदी एखाद्या गँगस्टर सारखी दिसून येत होती. या व्हिडीओची माहिती २४ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक आग्रापर्यंत पोहचली आणि त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. प्रियंका ही गेट पोलीस स्टेशनमध्ये तैनात होती. तिच्याविरोधात चौकशी देखील करण्यात आली होती. या कारवाईनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रियंकाला ट्रोल केले जाऊ लागले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com