West Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)

नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओरुन या वादाची भयानकता दिसून येत आहे.
West Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)
West Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)ANI/ Saam TV

कोलकाता : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. आणि याच दिवशी पश्चिम बंगालमधून एक निंदयनीय घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील भाटपाडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना (Subhas Chandra Bose) अभिवादन करण्यासाठी आलेल्या भाजप (BJP) आणि टीएमसीच्या (TMC) कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला असून या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी BJP खासदार अर्जुन सिंह (Arjun Singh) यांच्या सुरक्षा रक्षकांला हवेत गोळीबार करावा लागला आहे.

पहा व्हिडीओ -

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी TMS आणि BJP कार्यकर्ते बैरकपूर जमले आले. यावेळी नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून या व्हिडीओरुन या वादाची भयानकता आपणाला दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा गदारोळ सुरु असताना पोलीसही तिथेच होते.

अर्जुन सिंह दाखल होताच त्यांना टार्गेट करण्यासाठी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली असल्याचा आरोप भाजपकडून करण्याच आला आहे. दरम्यान अर्जुन सिंहंना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com