#RIPTwitter : ट्विटर बंद पडणार? इलॉन मस्क यांच्याकडे मालकी आल्यानंतर कंपनीत काय सुरुये?

ट्विटरवर शुक्रवारी जगभरात #RIPTwitter हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
Elon Musk
Elon Musk Saam TV

RIP Twitter: ट्विटरची मालकी जेव्हापासून इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आली आहे तेव्हापासून याबाबत रोज नव्या बातम्या समोर येत आहेत. सीईओंसह इतर अधिकाऱ्यांना हटवणं, पेड ब्लू टिक, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणे, कामाचे तास वाढवणे या घडामोडी आतापर्यंत याबाबत घडल्या आहेत. मस्क यांनी ट्विटरमध्ये केलेल्या अनेक बदलांचे पडसाद उमटू लागले आहेत. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरी कपात केली जात आहे. मात्र याचा उलटा परिणाम दिसून येत आहे. #RIPTwitter ट्विटरवरच ट्रेंड करत आहे.

#RIPTwitter ट्रेंडिंग

ट्विटरवर शुक्रवारी जगभरात #RIPTwitter हा ट्रेंड पाहायला मिळत आहे आणि सध्याच्या कर्मचार्‍यांपासून ते यूजर्सपर्यंत अशा अनेकांचं म्हणणं आहे की मस्क यांच्या नेतृत्वात जे सुरुये ते योग्य नाही. काही ट्विटमध्ये विनोदी पद्धतीने गंभीर आरोप केले जात आहे. तर मस्क यांच्यावर 'ट्विटरची हत्या' केल्याचा आरोप होत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की बहुतेक ट्विटर कर्मचारी त्यांच्या नवीन बॉसवर अजिबात खूश नाहीत आणि कंपनी सोडू इच्छित आहेत. (Latest Marathi News)

Elon Musk
Ration Card Holders : 'या' शिधापत्रक धारकांना मिळणार मोफत गहू, तांदूळ, तेल आणि मीठ; असा घेता येईल लाभ

शुक्रवारी सकाळी ट्विटरवर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या कथित राजीनाम्याची बातमी समोर आली. त्यासोबतच अशी परिस्थिती पाहता ट्विटरने आपली सर्व कार्यालये बंद केल्याचीही बातमी समोर आली. 21 नोव्हेंबरला ते पुन्हा उघडले जातील असे सांगितले जात आहे. यापूर्वी अशी बातमी आली होती की नोकर कपातीनंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना १२ ते १५ तास काम करावे लागत होते.

कर्मचाऱ्यांना कामासाठी दिलेली मुदत आणि कार्यालयीन वातावरण अधिक कडक केल्याने त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्यात ट्विटरवरील अनेक युजर्स ट्विटर बंद होण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यामुळेच सोमवारी सकाळपासून #RIPTwitter चा ट्रेंड सुरू आहे.

Elon Musk
Health News : टॅटू काढल्यानंतर रक्तदान का करू नये ? WHO ने सांगितले कारण

मस्कन यांनी 27 ऑक्टोबर रोजी दीर्घ वादानंतर ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतली. भारतासह जगभरातील ट्विटर कर्मचार्‍यांच्या नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय योग्य असल्याचं मस्क यांनी म्हटलं. कंपनीला दररोज लाखो डॉलर्सचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे नोकर कपातीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एप्रिल-जून तिमाहीत ट्विटरला 27 कोटी डॉलर्सचा तोटा झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com