ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर मुंबईतील भाविकांवर काळाचा घाला; कार दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर आज, शुक्रवारी मोठा अपघात झाला आहे. ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर एक कार खोल नदीत कोसळली आहे.
Rishikesh Car Accident
Rishikesh Car Accident saam tv

Rishikesh Car Accident News : ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर आज, शुक्रवारी मोठा अपघात झाला आहे. ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर एक कार खोल नदीत कोसळली आहे. या अपघातात (Accident) मुंबईतील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना एम्स ऋषिकेशमध्ये पाठवण्यात आले आहे.

Rishikesh Car Accident
सुंदर असल्यामुळेच मला अटक, बलात्काराचाही प्रयत्न; महिलेचा पोलिसांवर गंभीर आरोप

ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बद्रीनाथ धाम दर्शनासाठी जात असताना मोठा अपघात झाला आहे. सदर भाविक हे दहीसर, कोळीवाडा वसई, ठाणे, पालघर येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ५ प्रवासी हरिद्वारवरून बद्रीनाथ धामसाठी निघाले होते. ब्रम्हपुरीजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाच उपचारादरम्यान, मृत्यू झाला. सदर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

शिवाजी बाबर बुधकर (दहीसर, मुंबई), पुरुषोत्तम दत्तात्रेय खिलकुटी (पळुबंदर, कोळीवाडा, पश्चिम वसई, ठाणे), जितेंद्र प्रकाश लोखंडे (LBSH मार्ग टाकवाहल ठाणे) आणि धर्मराज नारायण (पचुबंदर, वसई पालघर)अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात कविंद्र ज्ञान सिंह), रविंद्र महादेव चव्हाण (मुंबई) हे दोघे गंभीर जखमी आहेत.

Rishikesh Car Accident
Delhi: आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 3 कामगारांचा मृत्यू

कार खड्ड्यात पडल्याने तिघांचा झाला होता जागीच मृत्यू

रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर जणांना उपसारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, उपचारासाठी आलेल्या ३ जणांपैकी एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमींना ऋषिकेश एम्समध्ये पाठवले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com