2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन ?

आय टी इंडस्ट्री मध्ये रोबोट ऑटोमेशन मुळे 2022 पर्यंत 30 लाख नोकऱ्या जाणार असल्याचे एक अहवालातून समोर आले आहे. आय. टी मधील इंजिनअर्स चे नोकऱ्या जाऊ शकतात असा भीतीदायक अहवाल बिजनेस स्टँडर्ड मध्ये या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे.
2022 पर्यंत 30 लाख आय. टी. नोकऱ्या कमी करणार रोबोटिक ऑटोमेशन ?
आय. टी. Saam Tv

पुणे : आय. टी. Information technology इंडस्ट्री मध्ये रोबोटिक ऑटोमेशन Robotic Automation मुळे 2022 पर्यंत 30 लाख नोकऱ्या जाणार असल्याचे एक अहवालातून समोर आले आहे. आय. टी मधील इंजिनअर्स चे नोकऱ्या जाऊ शकतात असा भीतीदायक अहवाल बिजनेस स्टँडर्ड Business standard मध्ये या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे.

आय. टी.
सोनू सूदच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश..

नॅसकॉम Nasscom या उद्योग संघटनेने म्हटले, त्यापैकी जवळपास ९ दशलक्ष कमी कुशल Low-Skill सेवा आणि बीपीओ BPO भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. मुख्यत: रोबोट प्रक्रिया ऑटोमेशन किंवा आरपीएमुळे RPA या ९ दशलक्ष पैकी ३०% किंवा सुमारे ३ दशलक्ष कामगारांच्या नोकऱ्या २०२२ पर्यंत जातील.

“टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्निझंट आणि इतर आरपीएच्या कामकाजामुळे २०२२ पर्यंत कमी-स्किल कामांमध्ये ३ दशलक्ष कपात करण्याचा विचार करीत आहेत.

त्यामुळे भारतातील आय टी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आय टी इंजिनिअरस समोर आपली नोकरी टिकविण्याच मोठं आव्हान उभ राहील आहे. मात्र रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन अर्थात आर ए पी ही आता पासून सुरू झाली नसून आय टी क्षेत्रात गेल्या - तीन चार वर्षांपासून आर ए पी लागू करण्यात येत आहे.

आर ए पी च कारण पुढे करून जास्त पगार असलेल्या सिनियर लोकांचे जॉब घालविण्याचा आय टी कंपन्यांचा डाव आहे. आर ए पी च कारण दाखवत सिनियर कर्मचाऱ्यांना घरी बसवून त्यांच्या जागी कमी वेतन वर काम करायला तयार असलेले फ्रेशरसना कामावर घेण्याचा हा आय टी कंपन्याचा डाव आहे.

असा दावा महाराष्ट्र राज्य आय टी कमिटीचे सदस्य तसेच फॉर्म फॉर आय टी फाईट चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने Central Government ज्या प्रकारे ट्विटर Twitter आणि व्हाट्सप Whats app साठी कायदे लागू केले. अगदी त्याच धरतीवर भारतातील आय टी कंपन्यांना देखिल कायदे लागू करण्याची गरज असल्याचं मत पवनजीत माने यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com