'RSS' हे तर भारतातील 'तालिबान' - RJD नेत्याची टीका

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वसंसेवक संघ ही संघटना अफगाणिस्तानातील तालिबानसारखी असल्याची खळबळजनक टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी केली आहे.
'RSS' हे तर भारतातील 'तालिबान' - RJD नेत्याची टीका
'RSS' हे तर भारतातील 'तालिबान' - RJD नेत्याची टीकाSaam Tv News

पाटणा: आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वसंसेवक संघ ही संघटना अफगाणिस्तानातील तालिबानसारखी असल्याची खळबळजनक टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी केली आहे. बिहारच्या पाटण्यातील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. (RSS is the Taliban of India said RJD leader)

हे देखील पहा -

राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आरएसएसची तुलना थेट तालिबान्यांशी केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी भाषण दिलं होतं, त्यात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना जगदानंद सिंह म्हणाले की, ''तालिबान एक संस्कृती आहे, जी अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात आहे. तालिबान्यांना धार्मिक हिंसेसाठी ओळखलं जातं. भारतामध्ये आरएसएससुद्धा हेच काम करत आहे. RSS लोकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते, RSS ची वाईट विचारसरणी भारतामधील संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे असं वादग्रस्त वक्तव्य जगदानंद यांनी केलं आहे त्यांच हे वादग्रस्त विधान समाजमाध्यामांमध्ये आल्यानंतर आरएसएस समर्थकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांकडून त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं जात आहे.

'RSS' हे तर भारतातील 'तालिबान' - RJD नेत्याची टीका
तालिबानचं कौतुक करणाऱ्या भारतीय मुसलमानांवर नसीरुद्दीन शाह यांची टीका

आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जगदानंद यांचं वक्तव्य कोणत्याच पद्धतीने चुकीचं नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे. तसेच आरएसएस ही संघटना कायमच देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, असंही मृत्युंजय तिवारी यांनी म्हणाले आहेत. त्यामुळे RSS आणि RJD आमने सामने आले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com