धक्कादायक! पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. तोपर्यंत आरोपी हत्या करुन फरार झाले होते.
धक्कादायक! पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
धक्कादायक! पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्याSaam Tv

केरळमध्ये राजकीय वैमनस्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची त्याच्या पत्नीसमोर हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. मृतक कार्यकर्त्याची पत्नी ही घटना घडली त्यावेळी वेळी त्याच्यासोबत होती. तिच्या डोळ्यांसमोर ही हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. तोपर्यंत आरोपी हत्या करुन फरार झाले होते.

हे देखील पहा -

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपस सुरु आहे. पोलीस तपासात मृतक व्यक्ती हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. मृतकाचे नाव संजीत असे असून तो एलापुल्लीचा रहिवासी होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भाजपने एसडीपीआय पक्षावर या घटनेनंतर गंभीर आरोप केले आहेत. एसडीपीआयच्या समर्थकांनीच संजीवची हत्या केली, असे खळबळजनक आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

धक्कादायक! पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
पैसे दे अन्यथा अश्लील Video व्हायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्या

पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. तसेच आरोपींची ओळख देखील अजून पटलेली नाही. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करतआहेत. या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. एका व्यक्तीची भर दिवसा चार जण रस्त्यावर हत्या कशी करु शकतात? त्यांना पोलिसांची भीती नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com