
कानपूर : क्रिकेट म्हणजे बहुतांश भारतीय तरुणांचा आवडीचा खेळ आहे. भारतात प्रत्येक तरुणाला प्रभावशाली क्रिकेटर बनायची स्वप्ने पडतात. त्यासाठी अनेकजण जिवाचे रान करतात. क्रिकेट खेळताना अनेक वादविवाद देखील होतात. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. कानपूरमध्ये क्रिकेट (Cricket) खेळताना चेंडू हा मैदानाशेजारी बसलेल्या आरएसएस कार्यकर्त्याला लागला. त्यानंतर मैदानात दोन गटात वाद झाला. या दोन गटाच्या भांडणाचे रुपांतर दंगलीत झाले. यामुळे कानपूरच्या मैदान परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Uttar Pradesh Latest Crime News )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, मैदानात काही तरुण क्रिकेट खेळत होते. क्रिकेट (Cricket) खेळताना चेंडू राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्याला (RSS) लागला. त्यामुळे चिडलेल्या या कार्यकर्त्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन मैदानातील खेळाडूंना काठीने मारायला सुरुवात केली. यादरम्यान, अनुराग पाल याने त्याचा खेळाडू मित्रांना का मारत आहात, याचा जाब आरएसएस कार्यकर्त्यांना विचारण्यास गेला. मात्र, त्यावेळी भडकलेल्या त्या कार्यकर्त्यांनी अनुरागलाही काठीने बेदम मारहाण केली. त्यात अनुराग गंभीर जखमी झाला. अर्धातासापासून सुरु असलेल्या हाणामारीनंतर अनुरागला प्रथमोचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनतर अनुरागला नौबस्ता पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात अनुरागच्या जबानीवरून १० ते १२ अज्ञान लोकांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या जबानीत त्याने आरएसएस कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. पोलिसांनी या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओच्या आधारवर तपास सुरु केला आहे.
एसीपी गोविंद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एसीपी गोविंद म्हणाले की, सदर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही गट एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरु करण्यात आला आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.