Rupee hit its all time low: रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेल्या रुपयाची मंगळवारी मोठी घसरण झाली.
rupee falls to Rs 80 Per Dollar
rupee falls to Rs 80 Per Dollar Saam Tv

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय चलन रुपयाची डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या सर्वात निचांकी स्तरावर घसरला आहे. यापूर्वी सोमवारी ७९.९८ रुपये प्रतिडॉलर इतका भाव होता. रुपयाची विक्रमी निचांकी पातळीवर पडझड झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होणार आहे. (Rupee hit its all time low falling Indian currency against dollar)

rupee falls to Rs 80 Per Dollar
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या दिल्लीसह प्रमुख शहरांमधील आजचे दर

वैश्विक बाजारात पडझड झाल्याचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर (Share Market) आणि त्यानंतर भारतीय चलन (Indian rupee) रुपयावरही दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आतापर्यंत सर्वात निचांकी स्तर ८०.०५ वर पोहोचला. गेल्या काही दिवसांत रुपयात प्रचंड वेगाने घसरण झाली आहे. आरबीआयकडून (RBI) उचललेल्या पावलांनंतरही रुपयामध्ये सुधारणा दिसून आली नाही.

अमेरिकी चलन डॉलर मजबूत स्थितीत राहिल्याने आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये तेजी यामुळे मंगळवारी सुरुवातीलाच व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी पातळीवर पोहोचला. तसेच अमेरिकेत मंदी, फेड रीझर्व्हचे वाढलेले दर, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ ही डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होण्याची कारणे आहेत, असे जाणकारांकडून सांगितले जाते.

rupee falls to Rs 80 Per Dollar
२०० कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण, देशव्यापी लसीकरणाचा विक्रम; WHO'ने केले कौतुक

इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंज मार्केटमध्ये रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८० च्या किंमतीवर खुला झाला. मात्र, काही वेळातच तो ८०.०५च्या पातळीवर आला. गेल्या सत्राच्या तुलनेत ७ पैशांनी रुपया कमकुवत झाला. सोमवारी रुपयाने पहिल्यांदाच ८० च्या स्तर गाठल्यानंतर ७९.९८ वर बंद झाला होता. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा घसरून १०५.९० डॉलर प्रतिबॅरल राहिला. विदेशी गुंतवणुकदारांनी सोमवारी १५६.०८ कोटी रुपयांच्या मूल्यांच्या समभागांची शुद्ध खरेदी केली होती.

दरम्यान, रुपयात झालेल्या ऐतिहासिक पडझडीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर नक्कीच पडणार आहे. भारतीय चलनाच्या घसरणीचा परिणाम थेट आयातीवर होईल. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढतील. देशात ८० टक्के कच्चा तेल आयात होतो. याचाच अर्थ भारताला कच्च्या तेलासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. विदेशी चलन जास्त खर्च होईल. त्यामुळे तेलाच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com