
वृत्तसंस्था: युक्रेन आणि रशियात (Russia) यांच्यात चांगलेच युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून रशियन फौजांचा जोरदार प्रतिकार केला जात आहे. युक्रेनच्या (Ukraine) सैनिकांनी रशियाचे रणगाडे (tank) उद्धवस्त करण्यात आले आहे. मोस्कवा युद्धनौका बुडवल्यावर युक्रेनने रशियाला (Russia) आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. युक्रेनने रशियाचा अत्याधुनिक टी-९० रणगाडा उद्धवस्त करण्यात आले आहे.
हे देखील पाहा-
युक्रेनने रशियाला दिलेल्या या प्रत्युत्तरात भारताची (India) चिंता आता अधिकच वाढली आहे. रशियन बनावटीचे टी-९० रणगाडा भारतीय लष्कराच्या (army) ताफ्यामध्ये आहे. शत्रूचा रणगाड्यावर हल्ला झाल्यास तो स्वतःचे संरक्षण करू शकणार अशी रशियाच्या T-९० रणगाड्याची रचना करण्यात आली होती. या रणगाड्यात स्वयंचलित संरक्षण प्रणाली देखील बसवण्यात आल्या आहे. युक्रेनच्या लष्कराने ड्रोन फुटेज जारी केले आहे.
त्यामध्ये त्यांनी ३८ कोटी रुपयांचा रशियन रणगाडा उद्धवस्त केला असल्याचाही दावा करण्यात आला आहे. युक्रेनच्या कीव इंडिपेंडंटच्या येथील एका वार्ताहराने शेअर केलेल्या फोटोमध्ये रशियाच्या T-९० रणगाड्याचे काही भाग दिसत आहेत. युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव ओब्लास्ट भागामध्ये या रणगाड्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन लष्करातील अत्याधुनिक रणगाडा उद्धवस्त केल्यामुळे युक्रेनच्या फौजांचे मनोबल आता उंचावले आहे.
रशियाने अद्याप आपला स्वयं-चालित T-१४ अर्माटा रणगाड्याचा लष्करात समावेश करण्यात आलेला नाही. रशियाने T-९० टॅंकची T-९०S हा नवा प्रकार जगभरात निर्यात केला जात आहे. भारतीय सैन्यदलात टी-९० भीष्म रणगाडे आहेत. त्यांची संख्या आगामी काळामध्ये वाढवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे युक्रेनने रशियाचा अत्याधुनिक रणगाडा उद्धवस्त केल्याने भारताची चिंता अधिकच वाढली आहे. भारतीय लष्कराला भविष्यामध्ये युद्धप्रसंगी अडचणींचा सामना करावा लागू शकणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.