१० मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना मिळणार १३ लाख, सर्वोच्च उपाधी, ' या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा

रशियाची लोकसंख्या वाढवण्यासाठी नवनवीन योजनांच्या घोषणा करण्यात येत आहेत, कारण...
Russia news update
Russia news updatesaam tv

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आक्रमक विधानं करून नेहमीच आंतराराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू बनत असतात. रशियाची लोकसंख्या (Russia Population) वाढवण्यासाठी पुतिन नवनवीन योजनांच्या घोषणा करत असतात. आताही पुतिन एका खळबळजनक वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. महिलांनी जर दहा मुलांना जन्म दिला आणि त्यांचं पालनपोषण केलं, तर त्यांना रशियाची 'मदर हिरोईन' अशी उपमा दिली जाईल, अशी घोषणा पुतिन (Vladimir Putin) यांनी केली आहे. एव्हढच नाही तर महिलांना तेरा लाख रुपयांचं बक्षिस देऊन सन्मानित केलं जाईल, असंही पुतिन यांनी जाहीर केलं आहे.

Russia news update
Indian Cricket Team : झिम्बाब्वे 'हरा'रे ! शिखर-शुभमनच्या चौफेर फटकेबाजीमुळं भारताचा मोठा विजय

महिलांना कधी मिळणार पैसे ?

व्लादिमीर पुतिन यांनी ही घोषणा १५ ऑगस्टला केली होती. महिलांना दहावं मुलं झाल्यावर एक वर्षाचा कालावधी संपल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. १३ लाख रुपये थेट महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. एखाद्या मुलाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यावरही महिलांना संपूर्ण तेरा लाखांची रक्कम अदा करण्यात येणार आहे.

रशियाची लोकसंख्या खूपच कमी

रशियाची लोकसंख्या गेल्या काही दशकांपासून कमी होताना दिसत आहे. २०२२ नंतर लोकसंख्येचं प्रमाण कमी होऊन १४५.१ मिलियन एवढी झाली आहे. २००० नंतर पुतिन राष्ट्रपती झाल्यानंतर अनेकदा लोकसंख्येच्या समेस्येवर लक्ष वेधलं आहे. दरम्यान, पुतिन यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक केला जात आहे.

Russia news update
Dahi Handi festival 2022 : गोविंदा पथकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा 'हा' मोठा निर्णय

याबाबत रशियाचे नेते डॉ जेनी मॅथर्स यांनी म्हटलं की, रशियाची लोकसंख्या कमी झाली आहे. परंतु, १९९० नंतर रशियाची लोकसंख्या वाढवण्यासाठी जनजागृती केली जात आहे. कोरोना महामारीचा रशियाच्या लोकसंख्येला फटका बसला. त्यानंतर युक्रेनच्या युद्धातही अनेक लोक मारले गेले. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही अशा प्रकारच्या घोषणा कराव्यात. कारण दहा मुलांसाठी १३ लाख रुपये खूपच कमी आहेत. या पैशातून मुलांचं पालनपोषन कसं करता येईल, रशियात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com